मेडिकल स्टुडन्टने केला पाच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार ! मुंबईतील धक्कादायक घटना 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

मेडिकल स्टुडन्टने केला पाच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार ! मुंबईतील धक्कादायक घटना 

मुंबई, (प्रबोधन न्यूज) -  मुंबईत एका पाच वर्षीय चिमुरडीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मेडिकलला  शिकणाऱ्या एका 23 वर्षीय विद्यार्थ्याने तिच्यावर बलात्कार केला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. 

मुंबईतील जोगेश्वरी भागात बेहराम बाग परिसरात एका पाच वर्षीय मुलीवर 23 वर्षीय मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या नराधमाने बलात्कार केला. गुरुवारी (29 एप्रिल) संध्याकाळी ही घटना घडली. या घटनेमुळे आजूबाजूचा परिसर हादरला आहे. सुनील सुखराम गुप्ता असे आरोपीचे नाव आहे. तो पीडित मुलीच्या घरमालकाचा मुलगा आहे.

या पीडित मुलीचे कुटुंब आरोपीच्या घरातील पोटमाळ्यावर भाड्याने राहते. काल संध्याकाळी नेहमीप्रमाणे ती आरोपीच्या घरी टीव्ही पाहण्यासाठी गेली. त्यावेळी नराधम आरोपीने दरवाजा बंद करुन तिच्यावर बलात्कार केला. यानंतर काही वेळाने ती मुलगी घरी आली असता रडत होती. तिच्या आईने तिला विचारले असता, तिने हा सर्व घडलेला प्रकार सांगितला. यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबाने याबाबत ओशीवरा पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर ओशीवरा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपी सुनीलला लगेचच बेड्या ठोकण्यात आला.